Pages

Saturday, July 21, 2012

मी पाहिलेले अनिरुद्ध बापू

॥ हरि ॐ ॥
  • १९१७ होळी पोर्णिमा ह्या दिवशी श्री साईबाबांच्या सूचनेनुसार श्री साईबाबांची मूर्ती हेमाडपंतांच्या  घरी प्रकटली. ती मूर्ती आजही तेथे आहे.
  • श्री हेमाडपंतांना  श्री साई नाथांनी आपला देह सोडण्यापूर्वी बोलावून घेऊन एक रुद्राक्ष माळ, शाळीग्राम व छोटा त्रिशूल दिला व तुझा वंशात हि माहिती गुप्त ठेवण्याबद्दल बजावून सांगितले व पुढील अवतारात मी स्वतः साई निवासमध्ये येऊन ह्याच गोष्टी परत मागेन व माझ्या ह्याच रूपाचे दर्शन तुझा वंशजांना घडविण असे वाचन दिले.
  • १९९६ साली श्री अनिरूद्धांनी , हेमाड पंतांच्या मुलाने व नातवाने पूर्णपणे गुप्तता पाळलेल्या ह्याच गोष्टी हेमाडपंतांचे नातू श्री अप्पासाहेब दाभोलकर आणि नातसून सौ. मीनाताई दाभोलकर ह्यांचाकडे मागितल्या व त्यांना साक्षात साईरुपात दर्शन दिले.
  • वरील सर्व वस्तू तसेच श्री हेमाडपंतांची  पगडी, श्री साई बाबांनी दिलेली अन्नपूर्णा मातेची मूर्ती  आजही तेथेच आहेत.
 श्री साईसतचरित्र, कोट्यावधी साई भक्तांचा अत्यंत लाडका ग्रंथ .हे  साई सत्चारीत्र साई निवास ह्या हेमाड पंतांच्या निवासस्थानी लिहून पूर्ण झाले. तेच साई निवास आजही तसेच्या तसेच आणि तीच पवित्र स्पंदने कायम राखून मुंबईत वांद्रे येथे लाखो साई भक्तांचे श्रद्धा स्थान बनले आहे.

गुरुवारचे प्रवचन 

परमपूज्य बापूंच्या सहवासात व सान्निध्यात येणाऱ्या अनेक व्यक्ती  बापूंच्या विलक्षण तेज :पुंज व भारदस्त  व्यक्तिमत्वाने भारावून जात असतात .हसत खेळत  सहजतेने साध्यासुध्या जीवनातील साध्यासुध्या गोष्टींबद्दल परमपूज्य बापूंच्या ,त्या काळातील  फक्त एका एक्सपर्ट डॉक्टरच्या विचारांनी ही मंडळी बापुंभोवती जमा झाली.श्री अनिरुद्ध हा त्यांच्या जीवनाचा अत्यंत  श्रेष्ठ आणि  मंगल  आधार झाला .बापूंबरोबर नित्य  नैमित्तिक जीवनाची बोलणी हळूच  आध्यात्मिक  विकास  करू लागली व त्याचबरोबर  बापूंच्या निरनिराळ्या  सामाजिक  सेवांमध्ये ह्या  मंडळीनी स्वत:ला वाहून घेतले .

  • हा लहानसा ग्रुप भक्ति व सेवा ह्या आध्यात्मिक मार्गाने प्रवास करताकरता अनेक सत्प्रवृत्त लोकांना आकर्षित करू लागला आणि हळूहळू त्याचेच रुपांतर आजच्या बापूंच्या गुरुवारच्या प्रवचनाला येणाऱ्या १ . ५० ते २ लाख श्रद्धावानभक्तांच्या समुदायात झाले.
  • गुरुवारी संध्याकाळी ७ :३० वाजता ह्या लाखो श्रद्धावानभक्तांसमोर परमपूज्य बापू विष्णूसहस्त्रनामातील एकेक नाम प्रत्येकवेळी घेऊन त्यावर मराठीतून प्रवचन करतात .
  • दर गुरुवारी रात्रौ ११ वा.त्याच ठिकाणी परमपूज्य बापू हिंदीतून श्रीसाईसच्चरित ग्रंथातल्या कुठल्याही १ ओवी वर प्रवचन करतात .
 परमपूज्य बापूंची प्रवचने म्हणजे ,आपला हा जन्म अधिकाधिक आनंदी कसा करायचा ह्याचे मार्गदर्शन. संकटावर व अडचणींवर उचित मानवी प्रयास व भक्तिमार्गाने मात कशी करायची ह्याचे परिणामकारक उपाय. मी शरीराने , मनाने व व्यवहाराने समर्थ कसा होऊ शकतो ह्याचे प्रशिक्षण . भोंगळ कर्मकांड व दुष्ट चालीरीती ह्या आमचा नाश कसा करतात हे समजून घेऊन,निखळ भक्तिमार्गाने त्या क्षमाशील कल्याणकारी परमात्म्याची कृपा कशी प्राप्त करून घ्यायची ह्याचा प्रत्यक्ष अनुभव. 

  • परमपूज्य अनिरुद्ध बापू कोणतीही योजना शास्त्रशुद्धरित्या अभ्यासून राबविण्यावरच  विश्वास ठेवतात. अनिरुद्ध समर्पण पथकाने समाजातील वेगवेगळ्या स्तरांवरील लोकांशी संपर्क साधून जे संशोधन केले व त्या प्रक्रियेतून जे निष्कर्ष काढले गेले त्यांची मदत बापूंच्या तेरा कलमी कार्यक्रमांची आखणी करताना झाली.
  • परमपूज्य अनिरुद्ध बापू कोणतीही योजना शास्त्रशुद्धरित्या अभ्यासून राबविण्यावरच  विश्वास ठेवतात. अनिरुद्ध समर्पण पथकाने समाजातील वेगवेगळ्या स्तरांवरील लोकांशी संपर्क साधून जे संशोधन केले व त्या प्रक्रियेतून जे निष्कर्ष काढले गेले त्यांची मदत बापूंच्या तेरा कलमी कार्यक्रमांची आखणी करताना झाली. 
  • पुरातन काळापासून आपल्या ऋषी-मुनींना वेगवेगळ्या औषधी वनस्पतींचा शोध लावून त्यांचे महत्व आयुर्वेदामार्फात सर्वांना पटवून दिलेले आहे. ह्या आपल्या प्राचीन विज्ञानाचा फायदा आजही वेद व उपनिषदांमध्ये रुपात आपणास मिळत आहे.
  • तुळस, बेल व ब्राम्ही ह्या भारतीय समाज माणसातील अत्यंत गौरवाच्या वनस्पती. ह्या वनस्पतींच्या जीवनवर्धक, रोगप्रतिकारक, रोगप्रतिबंधक व रोगनाशक शक्तींचा जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र ह्या आधुनिक वैज्ञानिक पद्धतींच्या सहाय्याने सखोल अभ्यास केला जातो.
  • आहारशास्त्र, आयुर्वेद व आधुनिक औषधांवर अभ्यासही ह्या संशोधन विभागातर्फे केला जातो.
प्राच्य विद्या प्रशिक्षण (बलं विद्या)
  • मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी आवशक अशा ६५ विद्या व ६४ कला विद्यार्थ्यांना लहानपणापासून शिकवणारी विद्यापीठे व गुरुकुल प्राचीन काळी भारतात ठिकठिकाणी कार्यरत होती. ह्या शिक्षणाने तयार झालेले तरुण बौद्धिक, मानसिक, व शारीरिक पातळ्यांवर कणखर व्यक्तिमत्वाचे होते. 
  •  भारताला पुन्हा सामर्थ्यवान, बलशाली बनविण्यासाठी आवशकता आहे ती बुद्धी, मन व शरीराने समर्थ नागरिकांची. देशावर लादल्या गेलेल्या दहशदवादी व युद्धजन्य परिस्थितीत विजयासाठी प्रत्येक नागरिकामध्ये फक्त शारीरिक नव्हे तर बौद्धिक व मानसिक सामर्थ्य  असणे आवश्यक आहे. 
  • हे सामर्थ्य प्राप्त करून देणाऱ्या विद्या आहेत. मुदगल, वज्र मुष्टी , सूर्य भेदन विद्या आणि यशवंती मल्लविद्या. 
  • परमपूज्य सद्गुरू श्री बापूंनी स्वतः प्रशिक्षण देऊन प्रथम आचार्य श्री रवींद्र मांजरेकर यांना बल विद्येत प्रवीण केले. आता ह्या प्रथम आचार्यांच्या मार्गदर्शनाखाली अनिरुद्ध समर्पण पथकाच्या कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण सुरु केलेले आहे. पुढील काही वर्षात प्रशिक्षण पूर्ण केलेले हे तरुण इतरांना त्या विद्येचे ज्ञान प्राप्त करून देऊ लागतील व त्यातूनच मोठ्या संखेने भारतातील तरुण हा विद्याभ्यास पूर्ण करून स्वतःच्या प्रगतीतून भारत समर्थ करतील हे निश्चित. 
उदी
  • जुईनगर येथील धुनी, रामनवमी चा यज्ञ व श्री गोविद्यापिथम येथील विभूती - हि बापूंची उदी मानली जाते.
  • अक्षरश: शेकडो गोणी उदी तयार होत राहते व तेवढ्याच जलदगतीने प्रत्येक बापू भक्ताला ती विनामुल्य मिळते.
  • ह्या बापूंच्या उदीची प्रचीती लक्षावधी भक्तांना खालील प्रमाणे येते 
  1. वेळोवेळी एकमेव आधार
  2. उदी जवळ असली कि भक्त निर्भय होतो कुठल्याही प्रसंगातून तरून जाण्यासाठी 
  3. कोणी मुठभर नेत, कोणी डबा भरून प्रत्येकाला पाहिजे तेवढी
  4. भक्त प्रेमाने हि उदी दररोज वापरतात; आपल्या सहकारी तसेच सग्यासोयर्यांना, मित्रांना, विनामुल्य वाटतात
  5. हि उदी म्हणजे साक्षात बापूंची चरण धूळ
  6. हि उदी कपाळावर म्हणजे कपाळ सदैव बापूंच्या चरणांवर
  7. हि उदी दूर करते न्यूनगंड, नैराशाला आणि अपयशाला.
  • ह्या उदीचे कार्य घडते ते फक्त एकाच मार्गाने, परमपूज्य बापुंवरील पूर्ण विश्वास.
गुरुपोर्णिमा
  • प्रत्येक बापू भक्ताला ह्या गुरुपोर्णिमेच्या पवित्र दिवशी आपल्या लाडक्या श्री अनिरूद्धांचे दर्शन घ्यायच असत आणि चरणावर आपला भाव अर्पण करावासा वाटतो.
  •   गुरुदक्षिणा म्हणून श्री अनिरुद्ध गुरुपोर्णिमेच्या दिवशीसुद्धा एक पैसाच काय परंतु साधे फुलपण व ग्रीटिंग कार्ड सुधा स्वीकारत नाहीत.
  • परमपूज्य बापू सांगतात," मला गुरुदक्षिणा द्यायची असेल तर रामनाम द्या,  घोरकष्टोद्धारण  स्तोत्र म्हणा आणि भक्तिमार्गाचा स्वीकार करून दुर्बलाच्या सेवेत कार्यरत व्हा."
  • मी माझ्या मार्गाने चालत राहणार. माझ्या बरोबर आलात तर तुमचे स्वागत आहे  अतिशय  प्रेमाने,  परंतु  कोणीही बरोबर आले नाही, अगदी सगळ जग माझ्या विरोधात उभं राहील तरी मी पुढे पुढे चालतच राहणार हे स्पष्टपणे बजावणारा - तो हा अनिरुद्ध.
  • कुठल्याही राजकीय पक्षाशी / विचारांशी दुरूनही बांधिलकी नको ह्या बद्दल आग्रही असणारा - तो हा अनिरुद्ध.
  • पाच प्रकारचे सामजिक संशोधन उपक्रम चालवून त्यांच्या निष्कर्षानुसार समर्थ भारत घडविणारा पहिला तेरा कलमी कार्यक्रम मांडणारा व करवून घेणारा - तो हा अनिरुद्ध.
  • वृषभ गौतम दत्तगुरू, नानक मेरी नाम स्मरू ! ह्या मंत्राच्या ताकदीतून सर्व धर्मांना समान प्राधान्य देणारा तो हा अनिरुद्ध.
  • चित्रकला व शिल्पकला ह्या कलांमध्ये आपल्या  कलाकृतींनी रसिकांचे मन मोहविणारा - तो हा अनिरुद्ध.
  • मुदगल, वज्र मुष्टी, यशवंती कुस्ती, लाठी आणि दांड पट्टा ह्या विद्यांचे स्वतः शिक्षण देऊन प्रशिक्षित आचार्य तयार करणारा, दांडपट्टा, लाठी, मुदगल फिरवतांना दर्शकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा - तो हा अनिरुद्ध.
  • कार्यकर्त्यान बरोबर क्रिकेट, बैडमिंटन तसेच अंताक्षरीत हिरीरीने मजेत भाग घेणारा - तो हा अनिरुद्ध.
  • मनुस्मृती जर सगळ्यांचे समान पाने कल्याण करू शकत नसेल तर ती  गाडून नवीन सत्य स्मृती निर्माण करण्याची जिद्द बाळगणारा - तो हा अनिरुद्ध.
  • बाल्गुन्हेगारांचे पुनर्वसन त्यांना गुन्हेगार न म्हणता करणारा आणि तुरुंगातील कैद्यांना परत माणसात सामावून घेणे हे प्रत्क्षात आणणारा - तो हा अनिरुद्ध.
  • अहिल्या म्हणजे भारतीय स्त्री वरील अन्यायाचे मूर्तिमंत प्रतिक म्हणून महिलांचा लढाऊ अहिल्या संघ निर्माण करणारा - तो हा अनिरुद्ध.
  • गुरुपोर्निमेला लक्षावधी भाविक येऊनही गुरू दक्षिणा म्हणून एक पैसाच काय पण साधी मिठाई, फुले व ग्रीटिंग कार्ड सुद्धा नाकारणारा - तो हा अनिरुद्ध.
  • इंग्रजीवरील बापूंचे प्रभुत्व, कॉम्पुटर व इंटर नेटचे विविधांगी ज्ञान आणि कॉम्पुटरचा उपयोग प्रत्येक कार्यासाठी करून घेण्याचा बापूंच्या प्रत्यक्षात आणल्या गेलेल्या  कल्पना, प्रत्येक क्षेत्रातील विज्ञानाचा प्रसार व प्रचार होण्यासाठी तळमळ ह्यामुळे बापू भक्तांची नाळ प्रगतीशील विज्ञानाशी सुरेख पणे जोडतो.
  • पत्नी, एक पुत्र व एक कन्या ह्यांच्या सह सहजतेने सुखी संसार करणारा एक यशस्वी गृहस्थाश्रमी- भक्तांच्या मनातील अध्यात्म आणि गृहस्थाश्रम ह्यांमधील विसंवाद दूर करतो.
  • जादुंच्या प्रयोगाने होणारे चमत्कार पाहून भक्त भुलू नये म्हणून ह्या हाथ चालाखीमागील रहस्य निरनिराळ्या उपक्रमांद्वारे गावो गावी पसरवणारा आदर्श समाज शिक्षक.
  • मी सामान्य मनुष्यच आहे ; मी तुमच्यातलाच एक आहे , मी स्वतःला कुणीही अवतार मनात नाही, मी फक्त अनिरुद्ध आहे हे वारंवार  प्रवचनातून, वृत्तपत्रातून (लोकप्रभा, तरुण भारत) निःसिंग्धिध पणे सांगून सुद्धा त्यांच्या प्रत्येक भक्ताला मात्र हाच माझा खरा देव हा ठाम विश्वास सहज पणे उत्पन्न करणारा.
  • भक्तां मध्ये मिसळून वागणारा, त्यांना मित्र म्हणवणारा, त्यांच्या बरोबर नामगजरात रमणारा, त्यांच्या मेळ्यात पूर्ण मोकळेपणाने बेभान होऊन नाचणारा, प्रतेकालाम्ह्नुनच अगदी जवळचा वाटणारा त्याचा सखा त्याचा मित्र - तो हा अनिरुद्ध.
  • कार ड्रायव्हिंग करणारा, बुलेटवर ऐटीत आरूढ होऊन जोरदार किक मारणारा, मी हि चित्रपट पाहतो हे आवर्जून सांगणारा , पाश्चत्य संगीतही सुंदर आहे ह्याची नोंद घेणारा - तो हा अनिरुद्ध.
  • बापू- कुटुंबवत्सल, पत्नी, व मुलांबरोबर समाधानी वैयक्तिक कौटुंबिक जीवन, आणि संपूर्ण विश्व हेच कुटुंब मानून सर्व विश्वाची काळजी वाहणारा. 
  • बापू डॉ. अनिरुद्ध MD medicin आणि consulting rheumatologist , यशस्वी डॉक्टर, आणि भक्ती मार्गाने विघातक गोष्टींना दूर करणारा. 
  • गुरुपोर्णिमा- एक पैसा किव्हा एक फुलही गुरुदक्षिणा न घेता सदैव भक्तांच्या पाठी उभा राहणारा.
  • स्वतः आखाड्यात उतरून प्राचीन बल विद्यांचे शिक्षण सतत चार वर्षे देऊन बल आचार्य तयार करणारा व आचार्यांच्या कडून फक्त पुरुषांनाच नाही तर संपूर्ण स्त्री वर्गाला  सुद्धा  परिपूर्ण बनवणारा.
  • मी तुमच्यातलाच आहे, एक साधा सुधा जीव असे सतत सांगत असतानाच कोट्यावधी भक्तांना वारंवार स्वतः असामान्य अवतारीत्वाचे अनुभव  देणारा. 
  • श्री अनिरुधांचे वेगळेपण, आगळेपण बापूंना भक्तांच्या भावविश्वात सर्वोच शिखरावर बसवते.
  • अध्यात्मिक कार्य असूनही न त्यांच्या कडे भगवी वस्त्र, ना त्यांच्या कपाळावर टिळा, ना त्यांच्या गळ्यात माळा.वेश आजच्या युगाला साजेसाच साधासुधा काळी पैन्ट, पांढरा शर्ट. परंतु तरीही बापूंच्या व्यक्तिमत्वाचा सर्वोच अध्यात्मिक अधिकार ह्या कुठल्याही बाह्यदेखाव्या शिवाय सहजपणे प्रतीत होतो.
  • आणि काळजावर ठसा उमटवते ते ग्रंथ राज मध्ये सहीनिशी प्रस्तुत केले एक वाक्य -
 परमेश्वरी तत्वांवर नितांत प्रेम व अविचल श्रद्धा असणारया प्रत्येकाचा मी दास आहे.



2 comments: