श्रवण - कीर्तन - विष्णुस्मरण |
चरणसेवन - अर्चन - वंदन |
दास्य - सख्य - आत्मनिवेदन |
भक्ती हे
जाण नवविधा || ९५ ||
(श्री साई सतचरित्र अध्याय २१ वा.)
हरी ओम
सदगुरू बापू कृपेने आपण श्रद्धावानांना श्रावण महिन्यात सदगुरूंच्या चिन्मय पादुकांचे पूजन घरोघरी करता येते. मुळात हा पवित्र महिना श्रवण भक्तीसाठी प्रसिद्ध त्यात असा योग म्हणजे तर दुधात साखरच जणू. पादुका पूजन करताना आपल्या हातून सहजपणे आणि अतिशय प्रेमाने त्या परमात्म्याची अर्चन भक्ती घडते जेव्हा भक्त प्रेमाने त्या सदगुरूला अष्टगंध लावून सुगंधीत अत्तराचे चर्चन करतो. त्याचप्रमाणे हात जोडून श्लोक म्हणताना तसेच लोटांगण घालताना वंदन भक्तीही घडते. आपल्या सदगुरू चरणी तुळशी पत्रे व बिल्व पत्रे अर्पण करताना जेव्हा जप करतो तेव्हा स्मरण भक्तीसह श्रवण भक्ती तर चालूच असते. पादुका पूजन म्हणजेच तर चरण सेवन आणि त्या समोर आपण आरती व गजर म्हणतो तेव्हा कीर्तन भक्तीचाही लाभ पदरात पडतो. गुरू ब्रह्मा गुरू विष्णू मंत्र तसेच बापूंचा ध्यान मंत्र म्हणून आपण त्याचे दास्यत्व स्वीकारतो तेव्हाच हा अनिरुद्ध कृष्ण बनून आपला सखा होतो व आपल्याकडून सख्य भक्तीही करवून घेतो.
जेव्हा मी लोणी साखर व केशर पाणी त्याला नैवेद्य म्हणून अर्पण करतो तेव्हा मी माझा त्रीदेह्च त्याच्या चरणी समर्पित केलेला असतो. असा माझा प्रेमळ बाप मला आत्मानिवेदानोत्तर सख्य देवून त्याच्या जवळ "गोकुळात" नेण्यास तत्पर होतो. पादुका पूजन करण्याच्या एका निश्चयाने बघा मला कित्येक पटीने पुण्य पदरात पडते ही त्याचीच कृपा म्हणून मला फक्त त्याच्या चरणांचीच आस आहे बापू मला फक्त तुझाच ध्यास आहे.
श्री राम
No comments:
Post a Comment