Pages

Friday, July 27, 2012

आधी कोंबडी का आधी अंड......

हरी ओम

लहानपणी गमतीखातर एक प्रश्न विचारला जाई कि आधी कोंबडी का आधी अंड...... 
आज मोठे झाल्यावर सुद्धा या प्रश्नाचे उत्तर ना मला मिळाले ना शास्त्रज्ञांना. पण तरीही आपण जास्त खोलात न शिरता या दोन्ही गोष्टींचे अस्तित्व मान्य करतो आणि मनमुरादपणे आस्वादही घेतो. मग मला प्रश्न पडतो कि देवाचे अस्तित्व मानण्यासाठी एवढे आढेवेढे का घेतले जातात. तेथे आधी प्रचीती मग विश्वास हे स्वताच्या सोयीचे नियम का लावले जातात. जन रीत नेहमी हेच दाखवत आलीय की एखादा महापुरुष अस्तित्वात असताना त्याची दखल समाज घेत नाही उलट त्यास विरोध करण्यातच आपला पुरुषार्थ मानतो. पुराण काळातील अगदी श्री कृष्णापासून ते मागच्या शतकातील श्री साई बाबांपर्यंत हीच प्रथा चालत आलीय आणि आज या २१ व्या शतकात सदगुरू श्री अनिरुद्ध बापू यांच्याबद्दल सुद्धा हे घडत आहे. 

मुळात ह्या चिखलफेकीने निंदा करणारी मंडळी कधीच स्वताला खरे साबित करू शकली नाहीत मात्र अल्पावधीसाठी प्रसिद्धी मात्र नक्कीच मिळवती झालीत. त्यातून नकी काय साध्य झाले अशा मंडळींचे काय भले झाले हे त्यांनी स्वताला विचारणे आवश्यक आहे. कारण सूर्यापर्यंत आज आपण प्रत्यक्ष पोहोचू शकलो नाही तरी तोच आपल्याला प्रकाश देतो आपल्याला जीवन देतो हे आपण १०० टक्के मान्य करतो. आणि त्या सूर्याला ज्याने बनवले त्या देवाचे अस्तित्व मात्र आपण अमान्य करतो हे कसे. एखादी गोष्ट अमान्य करताना एक शुल्लक मानव नकी कितीसे निकष लावू शकतो ......... 

ज्या मानवाची नजर जेमतेम काही मीटर अंतरावर सुस्पष्टपणे सूक्ष्म वस्तू न्याहाळू शकते आणि तरीही १ फुटावरचे अतिसूक्ष्म कण पाहायला त्याला मायक्रोस्कोप वापरावा लागतो. ठराविक क्षमतेपेक्षा अधिक किंवा कमी तीव्रतेच्या ध्वनी लहरी सुद्धा तो नीट ऐकू शकत नाही त्यासाठी त्याला वेगवेगळ्या वेव्हलेंग्थची रिसेप्शन स्वीकारणारी यंत्र प्रणाली वापरावी लागते मग हा माणूस भक्तीचे माध्यम न वापरता देवाचा आवाज कसा ऐकणार ? 

मला हे म्हणायचे नाही की तुम्ही इतर सर्व देव सोडून फक्त बापूचीच पूजा करा. स्वत: बापू सुद्धा श्री साई नाथांची आपला मार्ग दर्शक गुरू म्हणून तर श्री हनुमंताची आपला रक्षक गुरू म्हणून नित्य आराधना करतात. त्यांचा देव्हारा दत्त गुरूंच्या मूर्तीने सजलेला असतो.  आणि श्री अनिरुद्ध बापू जाहीरपणे सांगतात कि मी कोणाचा अवतार नाही ..... मी फक्त अनिरुद्ध आहे. 


ज्यांना तो विठ्ठल वाटला त्यांनी तशा भावाने त्यांना पूजले....ज्यांना तो राम वाटला त्यांनी तसे केले. कोणावरही कसलीच बंधने नाहीत कि जबरदस्ती नाही .....मात्र हे काही निव्वळ मनाचे खेळ नाहीत याची जाण ठेवणे आवश्यक आहे. कोलंबस जेव्हा जग सफारीला निघाला त्या काळात अशीच समजूत प्रचलीत होती की पृथ्वी ही सपाट आहे आणि त्याचे जहाज पृथ्वीच्या टोकावरून खाली कोसळेल. मात्र कोलंबसच्या मनात अपरंपार श्रद्धा होती कि पृथ्वी ही गोलच आहे. ह्या श्रद्धेच्या बळावरच त्याने अनेक नवीन शोध लावले. आज अशा गोष्टी करायला आपले विज्ञान व शास्रज्ञ समर्थ आहेत. आपल्याला गरज आहे आपल्यातील मानवाची खरी ओळख करून घेण्याची ..... 
त्याच्यातील मानवत्वाचा शोध घेण्याची. ... 
आणि यासाठी देवाचे देवत्व आधी मान्य केल्यास मानवाला स्वताचे मानवत्व समजून घेणे फारच सोपे जाईल हे १०८ टक्के खरे 

5 comments: