Pages

Sunday, July 29, 2012

वदावे अनिरुद्ध सेवावे अनिरुद्ध - हाच जीवनाचा खरा मार्ग
प्यारे ! जरा तो मनमे बिचारो ; क्या साथ लाये अब ले चालोगे |

जावे यही साथ सदा पुकारो , अनिरुद्ध ! अनिरुद्ध ! अनिरुद्ध ||

नारी धरा - धाम सुपुत्र प्यारे ,सन्मित्र सद्वाम्धव द्रव्य सारे |

कोई न साथी , हरीको पुकारो ,अनिरुद्ध ! अनिरुद्ध ! अनिरुद्ध ||

नाता भला क्या जगसे हमारा , आये यहा क्यो ? कर क्या रहे हो |

सोचो बिचारो , हरीको पुकारो , अनिरुद्ध ! अनिरुद्ध ! अनिरुद्ध ||

सच्चे सखा हरी ही हमारे , माता पिता स्वामी सुबंधू प्यारे |

भुलो न भाई दिन - रात गावो , अनिरुद्ध ! अनिरुद्ध ! अनिरुद्ध ||हरी ओम 

सजाण झाल्यापासून आपल्याला स्वताचे आयुष्य आपल्या मनाप्रमाणे जगावेसे वाटते. आज पर्यंत शाळेत , ज्युनिअर कोलेज मध्ये जी बंधने होती ती झुगारून देवून स्वच्छंद वाट चोखाळण्याचा मोह होतो. मनावरील मर्यादेचा अंकुश नाहीसा झाला की ते मन बेबंद हत्तीसारखे बेधुंद होवून जाते. शेवटी मनाच्या आधीन जातो तोच तर मानव असतो जो सोपे पर्याय निवडून आयुष्य सुखासीन करण्यासाठी धडपडत असतो. पण खरे सुख नक्की कशात मानायचे......... का सुख हे नेहमी मानण्यावरच असते. तर कधी एकाचे दु:ख हे दुस-यासाठीचे सुख ठरू शकते. नश्वर जीवानातील  शाश्वत सुख शोधण्यासाठी सर्वांचा आटापिटा चालू असतो पण जे पाहिजे ते मृगजलासारखे हुलकावण्या देत राहते. मग ह्याला पर्याय काय .... ? आम्ही चांगले वागलो काय किंवा वाईट वागलो काय , आमच्या नशिबी हे असेच येणार का - अशा विचारसरणीकडे मन झुकले की मग अजूनच प्रोब्लेम !! 

ह्या सगळ्याचे उत्तर एकच - माझा बापू , एकदा का ह्याला आपले मानले की त्याचे सदगुरू रूप आपल्या जीवनात कार्य करू लागते. आद्य पिपादादा म्हणतात त्याप्रमाणे मला पर्याय दोनच असतात आयुष्यात , एक तर मी बापूचा होईन किंवा बापुडा. निवड मला करायची असते. मी बापूचा होण्यासाठी मला फक्त प्रेमाने त्यास सदगुरू म्हणून स्वीकारायचे आणि स्वताचे आयुष्य मार्यादामार्गीय बनून जगायचे हीच त्याची आमच्याकडून अपेक्षा असते. येथे बाकी  देवाण घेवाण करण्याची काही गरजच नसते कधी की मला तू प्रमोशन मिळवून दे नोकरीत मग मी तुला हे देतो.......मला अमुकच कोलेजला अडमिशन मिळू देत मग तुला ते देतो. कारण तो तर द्यायलाच बसलेला आहे .जशी ज्याची पात्रता तसे त्याला माप. ह्या उप्पर तो स्वताचा हात त्या देण्यामागे ठेवतो तेव्हा ते माप भर भरून ओसंडून जीवनात वाहू लागते आणि संपूर्ण जीवनच तृप्ती व समाधानाने भरून जाते. पण हे सगळे एखाद्याला पटणार तरी कसे......!!

आपण गणिताचा पेपर सोडवताना एखाद्या उत्तराला दोन पर्याय असतील तर त्यातील पर्याय निवडताना आपल्याला उपजत असलेले ज्ञान व त्यानुसार समीकरणे वापरून तो प्रश्न सोडवतो. कधी ते उत्तर बरोबर येते तर कधी चुकते आणि जेव्हा चुकते तेव्हा आपल्याला कळते की आपण मांडलेली समीकरणे सुद्धा चुकीचीच होती. हीच गोष्ट जेव्हा प्रपंचात घडते तेव्हा चूक सुधारण्यासाठी आपली संधी गमावून बसलेलो असतो आणि ती वेळ टळून गेल्याने आता नव्याने सुरुवात करून नवीन गणित मांडायचे असते. पण हे असे किती वेळा करणे शक्य आहे........आणि प्रत्येक वेळी अगदी बरोबर येणे हे तरी कसे शक्य आहे ??

यासाठी मला आठवते माझ्या सदगुरूने मला दिलेली ग्वाही - " तू आणि मी मिळून शक्य नाही असे या जगात काहीही नाही" .  ह्यातील तू म्हणजे आपण ह्याचे प्रयास करण्यासाठी पहिले पाऊल पडले की लगोलग ह्यातील "मी" म्हणजे माझा सदगुरू कार्यास लागतो पण कधी तर हे प्रयास उचित मार्गाने व पावित्र्य हेच प्रमाण ह्या नियमाने बांधील असतील तेव्हाच. आणि त्याने कार्य सुरू केले की ते सिद्धीस जाण्यास तो कितीसा वेळ लागणार ......  मला समोर दिसलेल्या पर्यायांपैकी काय नकी निवडायचा ह्याचे मार्गदर्शन तो करतो, मला नेहमी यशाचाच मार्ग दाखवतो. हे घडते फक्त एकाच गोष्टीमुळे - जर मी त्याच्याशी अनुसंधान कायम ठेवले तरच. आणि त्याच्याशी अनुसंधान कायम ठेवण्याचा एकच सोपा मार्ग म्हणजे त्याचे नामस्मरण. 

आपण कोणत्याही कंपनीचा मोबाईल वापरला तरी सिमकार्डला नेटवर्क आहे तेव्हाच ना आपला कौल पूर्ण होणार. जर हे मला कळते तर मी नेहमी त्याच्या नेटवर्क मध्ये राहण्यासाठी नामस्मरण करत राहणे आवश्यक आहे. हीच ती दोन वाटापैकी योग्य वाट जी अनेक संत मंडळींनी स्वत: अनुसरली व तसेच वागण्याच बोध आपल्या अभंगातून दिला. ही वाट कधी काट्या कुट्याची दगड गोट्यांची वाटली तरी सोप्या वाटेने जावून मायेच्या समुद्रात बुडण्यापेक्षा नेहमीच सुरक्षित व सहज सोपी असते. 
माझ्या अनिरूद्धांकडे जाणारा प्रत्येक मार्ग हा नेहमीच यश देणारा असतो.

नामस्मरणाबद्दल बोलताना सदगुरू श्री बापू एका प्रवचनात उल्लेख करतात दासोत्तम श्री हनुमंताचा जो सदैव रामनाम जपत असतो. आपण जेव्हा उच्चार करतो तेव्हा ते स्वर आपल्या कानी पडत राहतात मात्र येथे हनुमंत रामनाम जपतोय तरीही त्याच्या कानी मात्र नाम पडते हनुमंत ...हनुमंत.......हनुमंत.. ह्याचा अर्थ जेव्हा भक्त आपल्या इष्ट दैवताचे नाम आळवत असतो तेव्हा देवमात्र त्या भक्ताचे नाम घेत असतो. 

ह्यावरून मी एवढा बोध घेणे  नक्कीच आवश्यक आहे - 

वदावे अनिरुद्ध सेवावे अनिरुद्ध - 
मग कोणी ब्राह्मण असो का क्षुद्र 
शिवाय कोणी अल्लाह - येशू भक्त 
ज्याची असेल श्रद्धा शुद्ध 
उद्धरेल त्यांना माझा अनिरुद्ध No comments:

Post a Comment